राणीपूर शिवारात वीज पडून दोन ठार
By Admin | Updated: June 23, 2016 21:40 IST2016-06-23T21:05:29+5:302016-06-23T21:40:48+5:30
शेतात काम करीत असतांना राणीपूर, ता.शहादा शिवारातील पावरा कुटूंबियांवर वीज पडल्याने दोन जण जागीच ठार

राणीपूर शिवारात वीज पडून दोन ठार
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 23- शहादा येथे शेतात काम करीत असतांना राणीपूर, ता.शहादा शिवारातील पावरा कुटूंबियांवर वीज पडल्याने दोन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना गुरुवार, २३ जून रोजी दुपारी घडली. मृतांमध्ये एका बालकाचा समावेश आहे.
राणीपूर येथील पावरा कुटूंबिय आपल्या शेतात कापूस लागवड करीत होते. दुपारच्या वेळी रिमझीम पाऊस सुरू असतांना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. त्यात गौरव हिंमत पावरा (सात वर्ष) व नर्मदाबाई शांतीलाल पावरा (३५) वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याच कुटूंबातील तीनजण जखमी झाले. आजूबाजूच्या शेतातील लोकांना ही घटना समजल्यावर जखमींना तातडीने शहादा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.