माळशेज घाटामध्ये बस उलटून दोन ठार
By Admin | Updated: January 4, 2016 03:59 IST2016-01-04T03:59:12+5:302016-01-04T03:59:12+5:30
नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटामध्ये लक्झरी बस व स्विफ्ट डिझायर गाडीची समारोसमोर धडक होऊन या अपघातामध्ये लक्झरी बस उलटल्याने दोन जण जागीच ठार झाले

माळशेज घाटामध्ये बस उलटून दोन ठार
मढ : नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटामध्ये लक्झरी बस व स्विफ्ट डिझायर गाडीची समारोसमोर धडक होऊन या अपघातामध्ये लक्झरी बस उलटल्याने दोन जण जागीच ठार झाले, तर इतर गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींची निश्चित संख्या समजू शकली नाही. ही घटनाआज रविवारी (दि. ३) रात्री ८ च्या सुमारास माळशेज घाटात वळण मार्गावर घडली.
मढ, खुबी, सावरणे तसेच एमटीडीसीमधील कर्मचाऱ्यांनी बसमधील जखमींना तत्परतेने बाहेर काढून पुढील उपचारासाठी आळेफाटा, ओतूर, मढ, खुबी, सावरणे या गावांमधील तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन लक्झरी, मुरबाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी : लक्झरी बस (एमएच ०४ जी ४२४०) ही बस लग्नाचे वऱ्हाड घेऊन कल्याणकडे जात असताना माळशेज घाटामध्ये वळणमार्गावर कल्याणहून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर (एमएच २३ वाय २२४७) यांची समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये लक्झरी बसमधील दोन जण जागीच ठार झाले असून, बसमधील अन्य जखमींचा आकडा समजू शकला नाही. दरम्यान, घटनेची माहिती समजताच ओतूर पोलीस व टोकावडे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातामध्ये परमेश्वर हारमोळे व कोतेकर (दोघेही रा. उल्हासनगर) दोघे जण जागीच ठार झाले आहेत.
आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलेल्या जखमींची नावे : लक्ष्मीबाई सोनवणे (रा. करडा), रामा आसरे (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश), किसान कोष्टी (रा. उल्हासनगर), रितिका कदम (रा. नाशिक), संजय कदम (रा. नाशिक), अनिता खोर (रा. उल्हासनगर), अरुणा सूर्यराव (रा. उल्हासनगर) जखमींना आळेफाटा येथील डॉ. सोनवणे हॉस्पिटल व माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लक्झरी बसमध्ये एकूण ५५ पुरुष व स्त्रिया होत्या. अपघातामधील जखमींचा निश्चित आकडा समजू शकला नाही. (प्रतिनिधी)