तीन अपघातात दोन ठार, दोन जखमी
By Admin | Updated: April 30, 2016 02:42 IST2016-04-30T02:42:31+5:302016-04-30T02:42:31+5:30
गांधारी पुलाशेजारील कठडा तोडून कार दोनशे फूट खोल कोसळून झालेल्या दुर्घटनेत कारमधील दोघी मायलेकी गंभीररीत्या जखमी झाल्या

तीन अपघातात दोन ठार, दोन जखमी
महाड : मुंबई - गोवा महामार्गावर शहरानजीकच्या गांधारी पुलाशेजारील कठडा तोडून कार दोनशे फूट खोल कोसळून झालेल्या दुर्घटनेत कारमधील दोघी मायलेकी गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६.१७ वा.च्या सुमारास अपघात घडला.
स्रेहा अनंत पवार (४४) व सायली अनंत पवार (२०) अशी जखमींची नावे असून पवार कुटुंबीय विरार येथून खेड येथे एस्टार कारने जात असताना वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला जाऊन खाली कोसळली. मोहोप्रे व गांधार येथील तरुणांनी अपघातग्रस्त जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर गांधारपाले येथील एका तरुणाचा अज्ञात वाहनाची ठोकर लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ११.३० वा. च्या सुमारास घडली. राजेश शांताराम वाघ (३०, रा. गांधारपाले) असे या मृत तरुणाचे नाव असून तो प्रातर्विधीसाठी महामार्ग ओलांडून जात असताना समोरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यावेळी गंभीररित्या जखमी झालेल्या राजेशचा रुग्णालयात मृत्यू झाला. गांधारपाले येथे ही घटना घडल्यानंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरुन पळ काढला. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.