मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू, 12 जण जखमी
By Admin | Updated: June 3, 2017 13:37 IST2017-06-03T13:37:46+5:302017-06-03T13:37:46+5:30
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर औंढे गावाजवळ भरधाव वेगात येणारी झायलो मोटार उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू, 12 जण जखमी
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 3 - मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर औंढे गावाजवळ भरधाव वेगात येणारी झायलो मोटार उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एका 13 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता तर अपघातात जखमी झालेली महिला उपचारादरम्यान दगावली.
तर एकूण 12 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणार्या मार्गावर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली झायलो ही प्रवासी मोटारमधील (MH 04 GD 438) चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही मोटार रस्त्याच्याकडेला असलेल्या डब्लू बॅरिकेटला जाऊन धडकली व उलटली.
सर्व जखमींना खंडाळा महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आर्यन देवदूत पथक व आयआरबीचे कर्मचारी यांनी गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले.