दोनशे महिलांनी केले ३.२५ लक्ष बेलपत्र अर्पण!
By Admin | Updated: August 29, 2016 17:29 IST2016-08-29T17:29:09+5:302016-08-29T17:29:09+5:30
शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त खामगाव येथून जवळच असलेल्या जागृती आश्रमात भगवान शिवशंकराला तब्बल ३.२५ लक्ष बेलपत्राचा अभिषेक केला.

दोनशे महिलांनी केले ३.२५ लक्ष बेलपत्र अर्पण!
>ऑनलाइन लोकमत
खामगाव (जि. बुलडाणा), दि.29 - शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त खामगाव येथून जवळच असलेल्या जागृती आश्रमात भगवान शिवशंकराला तब्बल ३.२५ लक्ष बेलपत्राचा अभिषेक केला.
जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज यांच्या संकल्पनेतून शेलोडी येथे बाराज्योर्तीलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान, शेवटच्या श्रावण सोमवारी जागृती आश्रमाती सिद्धवृक्षाखालील जागृत नर्मदेश्वराच्या पिंडीवर जागृती महिला भक्त मंडळाच्या सुमारे अडीचशे महिलांनी प.पू.शंकरजी महाराजांच्या मार्गदर्शनात विशेष महापूजा करून ३.२५ बेलपत्र अर्पण केले. यावेळी जागृती परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिषेकासाठी ३६ पोते बेलपत्र!
शेवटच्या श्रावण सोमवारी सोम प्रदोष असल्यामुळे जागृती महिला भक्त मंडळाच्या २५० सदस्यांनी सव्वा लाख बेल पत्र (लाखोली) अर्पण करण्याचा संकल्प केला होता. मात्र, सोमवारी प्रत्यक्षात हा संकल्प तडीस नेताना सव्वा तीन लक्ष बेल पत्र अर्पण केले. यासाठी तब्बल ३६ पोते बेलपत्र लागले. यावेळी सव्वाचार लक्ष ओम नम: शिवाय मंत्राचा जपही करण्यात आला.