पूराच्या पाण्यात बुडून दोनशे कोंबडीची पिले मृत्यूमुखी
By Admin | Updated: July 22, 2016 20:52 IST2016-07-22T20:52:59+5:302016-07-22T20:52:59+5:30
चार तास जोरदार पाऊस झाल्याने नदीला आलेल्या पूराचे पाणी कुक्कुट पालन शेडमध्ये शिरले आणि पाण्यात बुडून बाराशे कोंबडीची पिले मृत्यूमुखी पडल्याची

पूराच्या पाण्यात बुडून दोनशे कोंबडीची पिले मृत्यूमुखी
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 22 - चार तास जोरदार पाऊस झाल्याने नदीला आलेल्या पूराचे पाणी कुक्कुट पालन शेडमध्ये शिरले आणि पाण्यात बुडून बाराशे कोंबडीची पिले मृत्यूमुखी पडल्याची घटना धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे घडली.
गुरूवारी मध्यरात्री धारूर परिसरात जोरदार पाऊस झाला. भोगलवाडी येथील नदीला या पावसाने पूर आला. येथील शेतकरी अर्जून सोपान मुंडे यांचे नदीलगतच शेत असून याठिकाणी त्यांचे कुक्कुटपालनचे शेड आहे. या शेडमध्ये हे पाणी शिरल्यामुळे शेडमध्ये असलेली दोनशे कोंबडीची पिले या पाण्यात बुडून मेली. नदीच्या काठावरच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची भिंतही या पाण्यात वाहून गेली.