पंढरपुरात दोन हातगाडी चालकांवर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: June 30, 2016 23:52 IST2016-06-30T23:52:48+5:302016-06-30T23:52:48+5:30

येथील अर्बन बँकेसमोरील हातगाडी चालकावर सात ते आठ जणानी काठी दांडूक्याने प्राणघातक हल्ला केला

Two haul drivers in a road attack in Pandharpur | पंढरपुरात दोन हातगाडी चालकांवर प्राणघातक हल्ला

पंढरपुरात दोन हातगाडी चालकांवर प्राणघातक हल्ला

ऑनलाइन लोकमत,

पंढरपूर, दि. 30 - येथील अर्बन बँकेसमोरील हातगाडी चालकावर सात ते आठ जणांनी काठी आणि दांडुक्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना आज रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.
मिलनसिंग कुशालसिंग रजपूत आणि नरेश द्यानेश्वर पिंगळे (वय २६, रा. आनंदनगर, पंढरपूर) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रजपूत हे त्यांच्या दूध, बासुंदी विक्रीच्या गाडीवर काम करत असताना सात ते आठ तरुण मुले मोटारसायकलवरून आले व त्यांनी गाडी उलथवून लावत त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या गाडीसमोरच वडापावची गाडी असणा-या नरेश पिंगळे यांच्यावर काठ्याने हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. ऱात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्ह्याची नोंद सुरू होती.

 

Web Title: Two haul drivers in a road attack in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.