दोन कोेटींच्या सोन्याच्या जॅकेट चोरीचे धागेदोरे हैदराबादपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 03:09 IST2017-06-10T03:09:33+5:302017-06-10T03:09:33+5:30
दोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या जॅकेटची चोरी नोकराने केल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी समतानगर पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती.

दोन कोेटींच्या सोन्याच्या जॅकेट चोरीचे धागेदोरे हैदराबादपर्यंत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या जॅकेटची चोरी नोकराने केल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी समतानगर पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. या चोरीचा छडा लावण्यासाठी समतानगर पोलिसांचे एक पथक हैदराबादला गेले आहे.
मुंबईच्या काळाचौकी परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याने ही तक्रार काळाचौकी पोलिसांकडे केली होती. या व्यापाऱ्याने २९ मे रोजी दोन कोटींचे कच्चे सोने त्याच्या नोकरामार्फत मागविले होते. मात्र कांदिवलीत बसमध्ये शेजारी बसलेल्या प्रवाशाने ते लंपास केले, असे नोकराने मालकाला सांगितले. हे प्रकरण काळाचौकी पोलिसांनी दाखल करून घेत नंतर ते ३ जून रोजी समतानगर पोलिसांकडे वर्ग केले. हा नोकरदेखील नंतर फरार झाला. आता या नोकराच्या शोधार्थ समतानगर पोलिसांचे एक पथक हैदराबादला गेल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी सांगितले.