शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा हर्सूल तलावात मृत्यू

By admin | Updated: March 15, 2017 20:21 IST

हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 15 - हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. हे दोन्ही तरुण मंगळवारी दुपारी ४ वाजता घरातून बाहेर पडले होते. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सुफीयान शहा रज्जाक शहा(१७,रा. किराडपुरा) आणि समी खान अकबर खान (२२,रा. मिसरवाडी)अशी मृतांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सुफीयान आणि समी हे दोघेही जिवलग मित्र. समी हा बी.ए.उर्त्तीण असून तो पोलीस भरतीची तयारी करीत होता.शिवाय त्याने एका संस्थेत कॉम्प्युटरचा कोर्सलाही प्रवेश घेतला होता. नियमित पोलीस भरतीचा सराव तो करीत असत. तर सुफीयान हा रजिया फातेमा कॉलेजमध्ये बारावीला होता. बारावी बोर्ड परीक्षा तो देत होता. त्याचा एकच पेपर शिल्लक राहिला होता आणि या पेपरची परीक्षा २५ मार्च रोजी होणार होती. दोघे चांगले मित्र असल्याने ते ऐकमेकांच्या संपर्कात असत. मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समी हा मोटारसायकल घेऊन किराडपुऱ्यात सुफीयानच्या घरी गेला. यानंतर ते दोघे मोटारसायकलने हर्सूल तलाव परिसरात फिरायला गेले. तलावाच्या मागील बाजूला काठावर दुचाकी उभी केल्यानंतर त्यांना तलावात पोहण्याचे आकर्षण झाले आणि हे आकर्षणच त्यांच्या जिवावर बेतले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. असे असताना ते तलावात उतरले. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज त्यांना आला नाही. पाण्यात उतरल्यावर ते अचानक खोल पाण्यात गेल्याने बुडाले असावे, असा अंदाज पोलीस निरीक्षक ज््ञानेश्वर साबळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की,एक जण पाण्यात बुडत असल्याचे पाहुन दुसरा त्याच्या मदतीला गेला मात्र त्यासही पोहायला येत नसल्याने ते बुडाले.पोलिसांत नोंदविली तक्राररात्री ८ वाजेनंतर घराबाहेर कधीही न राहणारा सुफियान घरी आला नाही. शिवाय समी आणि सुफीयान हे मोबाईल उचलत नसल्याने दोघांचे नातेवाईक घाबरले होते. सुफियानच्या वडिलांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तर समीच्या भावांनी सिडको ठाण्यात रात्री धाव घेत दोघे हरवल्याची तक्रार केली होती. चपला आणि मोटारसायकल होती काठावरतलावाच्या काठावर चप्पलांचे दोन जोड आणि मोटारसायकल होती. मासेमारी करणाऱ्यांनी याबाबतची माहिती बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हर्सूल पोलिसांना दिली. नंतर अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जवानांनी शोध घेऊन सायंकाळी साडेचार वाजता दोघांचे प्रेत पाण्याबाहेर काढले.