चाकूने भोसकून दोन मित्रांची हत्या
By Admin | Updated: June 10, 2017 14:48 IST2017-06-10T14:48:59+5:302017-06-10T14:48:59+5:30
फलटण ते कांबळेश्वर रस्त्यावर दोन मित्रांची अज्ञातांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

चाकूने भोसकून दोन मित्रांची हत्या
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 10- फलटण ते कांबळेश्वर रस्त्यावर दोन मित्रांची अज्ञातांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या दोघांची हत्या प्रेमप्रकरणातून घडला असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
बत्तीस वर्षिय विजय यशवंत सुळ आणि तीस वर्षीय सुनील जालिंदर सोनवलकर अशी हत्या झाले्ल्या दोघा मित्रांची नावं आहेत. हे दोघेही पैलवान होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, कांबळेश्वरजवळ सकाळी सातच्या सुमारास या दोघांचे मृतदेह काही लोकांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचं दिसतं आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या ठिकाणी एक घर आहे. त्या घराला सध्या कुलूप असून पोलिसांनी संबंधितांना शोधण्यासाठी ठिकठिकाणी पथकं रवाना केली आहेत. प्रेम प्रकरणातून हे कृत्य घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. घटनास्थळी पोलिसांनी श्वानाला पाचारण केले आहे. मात्र अद्याप पोलिसांना यासंदर्भात ठोस माहिती मिळाली नाही.
दरम्यान, विजय सूळ याने पंचायत समितीची अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. त्यामुळे राजकीय वादातून तर हा प्रकार घडला नाही ना, या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केलाय.