त्या दोन माजी अध्यक्षांनीच केला डीसीसी घोटाळा - सुसाईड नोटने उडविली खळबळ
By Admin | Updated: July 21, 2016 18:44 IST2016-07-21T18:44:33+5:302016-07-21T18:44:33+5:30
संपूर्ण डीसीसी बँक घोटाळ्याला बँकेचे दोन माजी अध्यक्षच जबाबदार असल्याचा खळबळजनक या घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.
_ns.jpg)
त्या दोन माजी अध्यक्षांनीच केला डीसीसी घोटाळा - सुसाईड नोटने उडविली खळबळ
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २१ - संपूर्ण डीसीसी बँक घोटाळ्याला बँकेचे दोन माजी अध्यक्षच जबाबदार असल्याचा खळबळजनक या घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. आपण सातत्याने चुकीच्या निर्णयाच्या विरोधात होतो, परंतु या दोघांनीच घोटाळा केला आणि बेकायदेशीर ठराव घेऊन आम्हाला अडकवले, असेही या नोटमध्ये नमुद करण्यात आले आहे.
डीसीसी घोटाळा प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजत असताना आणि काही प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाल्याने गेली काही दिवसांपासून डीसीसी घोटाळा प्रकरणातील आरोपींना अटक होणार की नाही, याचे अटकळे बांधण्यात येत होते. आज आडसकरांच्या आत्महत्येने तर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी आडसकरांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे, सौ. आई व तात्यांच्या चरणी सा.नमस्कार. मी आज जात आहे, तरी मला माफ करा. कृष्णा व विशाख्ना यांना सांभाळणे तसेच त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी रमेशराव काकांवर आहे. तरी आपण मला घरचे सगळे माफ कराल, अशी इश्वराजवळ प्रार्थना करतो. सौ. सिमींतीनी पोरांचा निट सांभाळ कर व मला माफ कर. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक असताना मी बँकेचा अध्यक्ष व मंडळाच्या विरोधात संचालक होतो. आमचा विरोध असताना सुध्दा आम्हाला व इतर संचालकांना ऐन वेळचे कोणतेही ठराव घेऊन अडवले आहे. खरे बँकेचे दोन चेअरमन राजाभाऊ मुंडे व सुभाष सारडा हेच जबाबदार आहेत. इतर कोणीही बँकच्या कर्ज प्रकरणास जबाबदार नाही.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना याचा मी २००६ पासून चेअरमन आहे. तरी मी साखर कारखान्याला पूर्वीचे संचालक मंडळाने डीसीसीचे थकित कर्ज ६२ कोटी रूपये चार गळीत हंगामात फेडले व ऊर्वरीत जिल्हा बँकेचे पूर्वीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या कर्जासाठी सुध्दा जिल्हा बँकेकडे वनटाईम सेटलमेंटसाठी पत्र पाठविले आहे. तरी पूर्वीचे संचालक मंडळ याला जबाबदार आहे.
केज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंकूश इंगळे हा १६ वर्षे सभापती ठेवला. जो की दहावी पास सुध्दा नाही. पण तरी ठेवला. तसेच दामोदर शिनगारे हा धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्या वडीलांनी घेतला. त्याच्या दोन्ही मुलांना नोकऱ्या लावल्या. आज हे दोघे अंकुश इंगळे व दामोदर शिनगारे यांनी दोघांनी भ्रष्टाचार करून दोघात मिळून १५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी गोळा केली आहे. या दोघांपासून सुध्दा मला धोका होता.