शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘अवनी’च्या जीवावर उठलेला दोन पायांचा प्राणीच धोकादायक- प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 07:00 IST

अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले.

औरंगाबाद : भामरागडसारख्या भागात काम करताना आदिवासी लोकांना समाजाच्या प्रवाहात आणताना वन्य प्राण्यांसाठीही काम केले. अनेक वर्षांत वन्यप्राणी स्वत:हून मानवावर हल्ला करतो, असे कधीच दिसले नाही; परंतु आज वन्यप्राणी हिंसक होत असल्याचे सांगत त्यांना मारले जात आहे. अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले. औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे गुरुवारी देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडीजच्या सभागृहात आयोजित ‘रेअर शेअर’ कार्यक्रमात ते बोलत होते.डॉ. आमटे यांनी आपल्या व्याख्यानाच्या शेवटी अवनीच्या मृत्यूसंदर्भात आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी राज्य सरकार किंवा वन विभागाचे नाव घेतले नाही. मात्र, अप्रत्यक्षपणे अवनी वाघिणीला ठार केल्याच्या घटनेचा विरोध केला. आपल्या कार्याविषयी बोलताना ते म्हणाले की, आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांचा, त्यासाठी आलेल्या अनेक अडचणींचा संपूर्ण जीवन प्रवास मांडला. एका कुष्ठरोग्याला पाहून बाबांनी (बाबा आमटे) यांनी संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेसाठी दिले. लहानपणी कुष्ठरोगी आमचे सोबती होते. बाबांचे काम समाजाने स्वीकारले. तेव्हा त्यांच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भामरागडच्या जंगलातील आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी काम करण्याचे ठरवले. मंदाकिनीसोबत आनंदवनमध्ये विवाह झाला आणि दुसऱ्याच दिवशी भामरागड येथे गेलो. समाजकार्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मंदाकिनी कामात साथ देण्यावर ठाम राहिली.आदिवासी आजारपणात मांत्रिकाकडे जात. अशक्य गोष्टी मांत्रिक देवावर सोडून देत असे. अशांना बरे केल्यानंतर लोकांचा विश्वास झाला. प्रसूती, मोडलेल्या हाडांचे उपचार, डोळ्यांवर उपचार, मुलांसाठी शाळा, शेतीविषयी मार्गदर्शन केले. आज तेथील अनेक मुले वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्चपदावर पोहोचले. निरपेक्ष सेवेचा आनंद घेतला. लोकांनी उंचीवर नेले; परंतु जमिनीवर पाय घट्ट रोवलेले आहेत, असेही डॉ. प्रकाश आमटे म्हणाले.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणTigerवाघDeathमृत्यू