नांदेडमध्ये दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: April 8, 2015 01:40 IST2015-04-08T01:40:10+5:302015-04-08T01:40:10+5:30
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच असून, कंधार आणि हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे. या घटना रविवारी उघडकीस आल्या.

नांदेडमध्ये दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
नांदेड : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच असून, कंधार आणि हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे. या घटना रविवारी उघडकीस आल्या.
कंधार तालुक्यातील चिंचोली येथील किशन गणपत कौशल्य (४०) यांच्यावर कर्ज होते़ त्यात नापिकीमुळे ते आर्थिक संकटात सापडले होते़ याच नैराश्यातून त्यांनी ७ एप्रिलच्या पहाटे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़
दुसरी घटना हिमायतनगर तालुक्यातील धानोरा येथे घडली आहे. वारंगटाकळी येथे श्यामगिर दत्तगिर गिरी (३५) हे लाकडे आणण्यासाठी गेलेले परत न आल्याने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह धानोरा शिवारातील बाभळीच्या झाडाला लटकलेला दिसून आला़