धुळ्यात दोन शेतक:यांच्या आत्महत्या

By Admin | Updated: October 1, 2014 02:27 IST2014-10-01T02:27:06+5:302014-10-01T02:27:06+5:30

दोन दिवसांत जिल्ह्यात दोन शेतक:यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही़

Two farmers of Dhule: The suicides | धुळ्यात दोन शेतक:यांच्या आत्महत्या

धुळ्यात दोन शेतक:यांच्या आत्महत्या

>धुळे : दोन दिवसांत जिल्ह्यात दोन शेतक:यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही़
खोरदड (ता़ धुळे) येथील पांडूरंग रतन पाटील (3क्) यांनी सोमवारी सकाळी शेतात विषारी औषध प्राशन केले. त्यांचे भाऊ विलास पाटील यांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आह़े
दुस:या घटनेत अमराळे (ता़ शिंदखेडा) येथील चुडामण उर्फ बापू दयाराम सोनवणो (52) यांनी रविवारी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली़ छोटूलाल पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून शिंदखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)

Web Title: Two farmers of Dhule: The suicides