वर्ध्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: July 21, 2015 00:58 IST2015-07-21T00:58:43+5:302015-07-21T00:58:43+5:30
सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कारंजा तालुक्यातील चिंचोली येथील रुपचंद डोंगरे

वर्ध्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
कारंजा : सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कारंजा तालुक्यातील चिंचोली येथील रुपचंद डोंगरे (५८) यांनी गळफास लावून, तर मोरांगणा येथील मंगेश दौलत भजभुजे (२७) यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची बाब सोमवारी उघडकीस आली. रुपचंद यांनी बँकेचे १० लाख ६७ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. यापैकी कृषी पीककर्ज १ लाख १ हजार ५५७, तर शेतीपयोगी उपकरण ट्रॅक्टरचे ९ लाख ६६ हजार ८५ रुपये कर्ज थकीत असल्याची माहिती आहे. कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.
मंगेश यांचा सोमवारी पहाटे सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्याकडे आठ एकर शेती आहे. शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. त्याच्यावर बँकेचे ८५ हजार रुपये व उसनवारीचे असे एकूण तीन लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांनी शनिवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले होते. (प्रतिनिधी)