अकोला जिल्ह्यात दोन शेतमजुरांची आत्महत्या

By Admin | Updated: February 18, 2015 01:20 IST2015-02-18T01:20:53+5:302015-02-18T01:20:53+5:30

एकाच दिवशी दोन शेतमजुरांनी घेतला गळफास.

Two farm laborers suicides in Akola district | अकोला जिल्ह्यात दोन शेतमजुरांची आत्महत्या

अकोला जिल्ह्यात दोन शेतमजुरांची आत्महत्या

मूर्तिजापूर (जि. अकोला) : एकाच दिवशी दोन शेतमजुरांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन घटना सोमवारी मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे घडल्या.
तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे सोमवारी पहाटे किशोर किसन इंगळे (४0) याने घरातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती गावात वार्‍यासारखी पसरून, त्याच्या घरासमोर गर्दी झाली. राजू नारायण चव्हाण(५0) हा आणखी एक शेतमजूर त्याच्या शेजारीच राहत होता. किशोर इंगळेने केलेली आत्महत्या, त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हा सर्व प्रकार त्याने डोळय़ाने पाहीला. त्यानंतर सकाळी १0 वाजताच्या सुमारास त्यानेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना घडल्याने गावात खळबळ उडाली. दोन्ही घटनांमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Two farm laborers suicides in Akola district