हिंगोलीत वसमत शहरात दोन स्फोट झाल्याचे वृत्त, ४ ठार
By Admin | Updated: March 18, 2016 15:53 IST2016-03-18T13:14:45+5:302016-03-18T15:53:10+5:30
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा गावात एका वेल्डींगच्या दुकानात स्फोट झाला आहे.

हिंगोलीत वसमत शहरात दोन स्फोट झाल्याचे वृत्त, ४ ठार
ऑनलाइन लोकमत
वसमत, दि. १८ - हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात दोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील हट्टा गावातील एका गॅरेजमध्ये वेल्डींग करताना स्फोट झाला आहे. या स्फोटात ४ जण ठार झाले असून, १ जण गंभीर जखमी झाला आहे.
दुसरा स्फोट वसमत शहरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात झाला असून, यात कचरा वेचणारा मुलगा जखमी झाल्याचे वृत्त आहे. वसमत शहरातील बहिर्जी नगर भागात सकाळी ९.३०च्या सुमारास अंकुश नावाचा १४ वर्षीय मुलगा भंगार वेचताना मिळालेल्या एका डब्यात स्फोट झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अँसीडच्या डब्यात हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हे दोन्ही स्फोट नेमके कशामुळे झाले ते समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. जनतेने कोणत्याही अफवांना बळी न पड़ता शांतता ठेवण्याचे आवाहन उपअधीक्षक पियूष जगताप यांनी केले आहे.