शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यातील आरोपी असलेल्या दाेन अभियंत्यांना पदोन्नती, आराेपपत्रच नाही; मॅटचा एकतर्फी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 06:59 IST

Irrigation Scam: बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल झालेल्या दोन अधीक्षक अभियंत्यांनी मुख्य अभियंता पदावर पदोन्नतीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय लवादापुढे (मॅट) दाखल याचिकांची माहिती मंत्रालयात पोहोचू नये, असे डावपेच लढविले.

नागपूर : बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल झालेल्या दोन अधीक्षक अभियंत्यांनी मुख्य अभियंता पदावर पदोन्नतीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय लवादापुढे (मॅट) दाखल याचिकांची माहिती मंत्रालयात पोहोचू नये, असे डावपेच लढविले. त्यामुळे सरकारचे म्हणणेच  सादर झाले नाही आणि लवादाने दोघांना तात्पुरत्या पदोन्नतीचा एकतर्फी आदेश दिल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला.

विदर्भ पाटबंधारे महामंडळात कार्यरत या दोन अधीक्षकांनी खाते चौकशीत क्लीन चिट मिळाल्याच्या मुद्द्यावर पदोन्नतीची मागणी मॅटपुढे केली खरी; परंतु, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून दाखल फौजदारी गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात चालढकल केल्याचे सुनावणीत स्पष्ट झाले. लवादाचे आदेश निघाल्यानंतर जलसंपदा मंत्रालय खडबडून जागे झाले असून, आदेशाची अंमलबजावणी थांबविण्यासाठी विधी व न्याय तसेच सामान्य प्रशासन विभागाला साकडे घातले आहे.

७ फेब्रुवारी रोजी हा आदेश देताना या फौजदारी गुन्ह्यांमध्ये न्यायनिवाडा करण्याची सरकारची इच्छा दिसत नाही, असे ताशेरे ओढले आहेत. सिंचन घोटाळ्याप्रकरणी चितळे समिती, मेंढेगिरी समिती व वडनेरे समितीच्या शिफारशींचा विचार करता या अभियंत्यांना कार्यकारी पदावर नियुक्ती तसेच पदोन्नती देता येत नसल्याने जलसंपदा मंत्रालयाने नागपूर मॅटच्या एकतर्फी आदेशाची गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकरणातील गुन्हे पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराशी संबंधित आहेत. गुन्हे २०१८ मध्ये दाखल झाले आहेत. मॅटमध्ये याचिका दाखल करणारे अधीक्षक अभियंते राजेश सोनटक्के यांच्यावर तीन, तर दुसरे याचिकाकर्ते कन्नाजीराव वेमूलकोंडा यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे.

तीन वेळा सूचना, तरीही प्रतिसाद नाही n नागपूर मॅटचे उपाध्यक्ष श्री भगवान व सदस्य एम. ए. लोवेकर यांनी या दोन्ही याचिकांवर दि. २४ नोव्हेंबर २०२२, दि. १२ डिसेंबर २०२२, दि. ४ जानेवारी २०२३, दि. १० जानेवारी २०२३ व दि. १२ जानेवारी २०२३ अशी पाच वेळा सुनावणी घेतली. n त्यापैकी किमान तीनवेळा त्यांनी शासनाने त्यांचे म्हणणे सादर करावे, अशी सूचना केली. तरीही शासनाकडून कोणतेही म्हणणे सादर केले नाही. n अभियंत्यांच्या बाजूने मॅटमधून एकतर्फी निकाल दिला जावा, या हेतूनेच हे जाणीवपूर्वक केल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार