दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2017 22:41 IST2017-04-30T22:41:36+5:302017-04-30T22:41:36+5:30

उन्हाळाच्या सुट्टीसाठी आजोळी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना मारशिरसमधील बोरगाव येथील आहे.

Two drunken brothers die drowning | दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

ऑनलाइन लोकमत

श्रीपूर (सोलापूर), दि. 30 - उन्हाळाच्या सुट्टीसाठी आजोळी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना मारशिरसमधील बोरगाव येथील आहे. विवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास उजनी कालव्याच्या कॅनॉलमध्ये बुडून या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.  ओम सतीश लोणे (वय १४) व  प्रसन्न सतीश लोणे (वय १२) अशी  मृत मुलांची नावे आहेत.
 
संतोष शिवाप्पा शिवणगी हे आपली दोन मुले आणि दोन भाच्यांसह बोरगाव (ता. माळशिरस) येथील उजनी कालव्याच्या कॅनॉलमध्ये पोहोण्यास गेले होते. चारही मुलांना पोहता येत नव्हते. तरीही ते पाय-यावर पाण्यात पाय सोडून बसले होते. अचानक त्या चौघांनी पाण्यात उड्या मारल्या. पोहता येत नसल्याने ते चौघे आरडा-ओरडा करु लागले. या आवाजाने बाजूला पोहत असलेल्या रोहित साठे याने त्यांच्याकडे धाव घेतली.
 
पाण्यात बुडत असलेल्या अथर्व संतोष शिवणगी (वय १०), विराज संतोष शिवणगी (वय १४) यांना तत्काळ बाहेर काढले. यामुळे दोन मुलांचे प्राण वाचले. परंतु पाण्याचा वेग जादा असल्याने ओम लोणे (वय १४) व  प्रसन्न लोणे (वय १२) ही दोन मुले वाहून गेली. काही वेळानंतर हे दोघे मृतावस्थेत सापडले. (वार्ताहर)

Web Title: Two drunken brothers die drowning