शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात प्रकरणी दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन डॉक्टरांना रंगेहाथ पकडले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 11:50 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला सहकाऱ्यासह अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपाच महिन्यांची गर्भवती असलेल्या शुभांगी यांचा त्या ठिकाणी गर्भपात झाला.

फलटण, दि. 8 -  आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याच्या कारणावरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला सहकाऱ्यासह अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्हीही डॉक्टर बारामती अन् दौंड तालुक्यातील आहेत. गलांडेवाडी येथील आरोपी डॉक्टर प्रवीण कदम याची पत्नी शुभांगी यांना काही दिवसांपूर्वी तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या शुभांगी यांचा त्या ठिकाणी गर्भपात झाला. त्यानंतर गर्भपाताशी संबंधित सर्व कागदपत्रे डॉक्टर प्रवीण कदम याने मागवून घेतली. तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिर्यादी अनिल कदम यांना संबंधित बारामतीच्या डॉक्टराकडून वेळोवेळी धमक्या येऊ लागल्या. व्हॉट्सअॅपवरून वेगवेगळे विचित्र मेसेजही फिरू लागले. या गोष्टीला कंटाळून अनिल डॉक्टरांनी प्रवीणचा  मोबाइल नंबर ब्लॉक केला. 

यानंतर अनिल यांच्या विरोधात आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कमिटीने या प्रकरणाची चौकशी केली. डॉक्टर अनिल कदम यांनी केलेले उपचार व्यवस्थित असल्याचा अहवालही या कमिटीने दिला.

मात्र त्यानंतरही प्रवीण कदम यांचा सहकारी मित्र डॉक्टर नितीन टेळे याने फोन करून पैशांची मागणी केली. सातत्याने दहा लाख रुपयांची मागणी होऊ लागल्यामुळे घाबरलेल्या कदम डॉक्टरांनी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर सापळा रचण्यात आला. फोनवर तडजोड करून दहा लाखांऐवजी नऊ लाख रुपये देण्याचे ठरले.

गुरुवारी सायंकाळी तरडगाव येथील एका पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये पैसे देण्याचे ठरले. दोन हजार रुपयांच्या खऱ्या खुऱ्या नोटेखाली कोरे कागद लावून बंडल तयार करण्यात आले. त्या ठिकाणी आलेले डॉक्टर प्रवीण अन् डॉक्टर नितीन यांनी खंडणीच्या स्वरूपात असलेली ही रक्कम स्वीकारताच आजूबाजूला उभारलेल्या पोलिसांनी या दोघांना रंगेहाथ पकडले.

टॅग्स :Crimeगुन्हा