ताडदेव येथे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: July 14, 2014 03:14 IST2014-07-14T03:14:54+5:302014-07-14T03:14:54+5:30
सलग चार दिवस पडणाऱ्या पावसात शनिवारी मध्यरात्री ताडदेव येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघे जण मृत्युमुखी पडले तर एक जण जखमी झाला आहे

ताडदेव येथे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
मुंबई : सलग चार दिवस पडणाऱ्या पावसात शनिवारी मध्यरात्री ताडदेव येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघे जण मृत्युमुखी पडले तर एक जण जखमी झाला आहे. मनोज कुमार सिंग (३६) आणि मनीष कुमार सिंग (२२) अशी मृतांची नावे असून, रोहित कुमार सिंग हे जखमी झाले आहेत.
महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताडदेव येथील रतन टाटा रोडवर रिकाम्या परिसरात शनिवारी मध्यरात्री २.३२ वाजताच्या सुमारास भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या. या दुर्घटनेतील मनोज कुमार सिंग आणि मनिष कुमार सिंग यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तर रोहित कुमार सिंग या जखमीवर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, आज दिवसभरात शहरात पाच ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिवाय शहरात ९, पूर्व उपनगरात ८ आणि पश्चिम उपनगरात ११; अशा एकूण २८ ठिकाणी झाडे पडण्याच्या तक्रारी नियंत्रण कक्षाकडे आल्या. दाखल झाल्या. (प्रतिनिधी)