गोंदिया व गडचिरोलीत वीज पडून दोन ठार

By Admin | Updated: June 16, 2014 01:00 IST2014-06-16T01:00:37+5:302014-06-16T01:00:37+5:30

अंगावर वीज पडल्याने रविवारी सायंकाळी ५ वाजता वाडेगाव येथील मनोहर मारबते यांचा मृत्यू झाला, तर गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील येथे मंजुषा संभा बोरकुटे (१४) ही गोवऱ्या

Two dead in Gondia and Gadchiroli | गोंदिया व गडचिरोलीत वीज पडून दोन ठार

गोंदिया व गडचिरोलीत वीज पडून दोन ठार

वडेगाव(गोंदिया)/चामोर्शी (गडचिरोली) : अंगावर वीज पडल्याने रविवारी सायंकाळी ५ वाजता वाडेगाव येथील मनोहर मारबते यांचा मृत्यू झाला, तर गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील येथे मंजुषा संभा बोरकुटे (१४) ही गोवऱ्या वेचण्यासाठी शेतात गेली असता, शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तिच्यावर वीज पडली. त्यामुळे ती जागीच ठार झाली.
पावसाळा सुॅरू झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात वीज पडण्याच्या घटना घडत आहेत. चोरखमारा येथील मासेमार संस्थेचे अध्यक्ष मनोहर मारबते हे तलावाकडे जात असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. चामोर्शी तालुक्यातील अनखोडा तिच्यासोबत गेलेली मन्नाबाई विश्वनाथ कोडापे ही जखमी झाली.
मंजुषा ही मुळ गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील असून ती आजोबाकडे राहण्यासाठी आली होती. तहसीलदार एस. टी. खंडारे यांनी मंजुषाच्या कुटुंबीयांना तत्काळ पाच हजार रूपयाची मदत दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Two dead in Gondia and Gadchiroli