मुंबईच्या राजकारणावर दोन दिवसांनंतर बोलेन - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: March 6, 2017 14:15 IST2017-03-06T14:11:15+5:302017-03-06T14:15:46+5:30

मुंबई जिंकली आहे, दोन दिवसांनी राजकारणावर बोलेन, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात दिली आहे.

Two days after Mumbai's politics, Bolen said - Uddhav Thackeray | मुंबईच्या राजकारणावर दोन दिवसांनंतर बोलेन - उद्धव ठाकरे

मुंबईच्या राजकारणावर दोन दिवसांनंतर बोलेन - उद्धव ठाकरे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची निवड झाली आहे. भाजपापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. 
 
दरम्यान, निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, ठाणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.
(ठाणे मनपाच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे)
 
शिवाय,  विरोधीपक्षांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक बिनविरोध केल्याबाबत उद्धव यांनी विरोधकांचे आभारदेखील मानले. 
(‘वर्षा’ बंगल्यावरही उपलोकायुक्त नेमा - उद्धव ठाकरे)
 
यावेळी, मुंबई मनपा महापौर निवडणुकीबाबत प्रश्न विचारले असता, त्यांनी 'मुंबई जिंकली आहे, दोन दिवसांनी राजकारणावर बोलेन', असे सांगत उद्धव यांनी मुंबई महापौर पद निवडणुकीबाबत बोलणे टाळलं. 
 

Web Title: Two days after Mumbai's politics, Bolen said - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.