तुंगारेश्वर धबधब्यात बुडून दोन कॉलेज तरुण बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 21:40 IST2017-07-21T21:36:51+5:302017-07-21T21:40:09+5:30
तुंगारेश्वर धबधब्यात बुडून दोन कॉलेज तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली

तुंगारेश्वर धबधब्यात बुडून दोन कॉलेज तरुण बुडाले
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 21 - तुंगारेश्वर धबधब्यात बुडून दोन कॉलेज तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले नव्हते. गेल्या दिड महिन्यात धबधब्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सहावर पोचली आहे. चंद्रकांत गुप्ता आणि सनी कानोजिया अशी बुडालेल्या मुलांची नावे असून ती बारावीत शिकत होती. मुंबईतील विलेपार्ले परिसरात राहणारे 9 कॉलेज तरुण कॉलेजला दांडी मारुन दुपारी तुंगारेश्वर धबधब्यात फिरायला आले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास चंद्रकांत आणि सनी खोल पाण्यात बुडाले. वालीव पोलीसांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली होती. पण रात्री उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले नव्हते.