पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू
By Admin | Updated: August 15, 2016 02:55 IST2016-08-14T15:30:16+5:302016-08-15T02:55:55+5:30
खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास अकोल्यातील आदर्श कॉलनीत घडली.

पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू
>अकोला : खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास आदर्श कॉलनीत घडली. आदर्श कालनीत महापालिका शाळा क्रमांक १६ नजिक एक नाली खोदली आहे.या ठिकाणी ही मुले खेळत असताना अचानक पाय घसरू न ही दोन्ही मुले नालीत पडली. नालीत पाणी असल्याने या पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. नगरसेवक बाळ यांनी या दोन्ही बालकांना तातडीने सर्वोपचार रू ग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दोन्ही बालकांना मृत घोषित केले.सिद्धार्थ राजेश घनगावकर (७) व कृष्णा राकेश बहेल (८) अशी या मृतक बालकांची नावे आहेत.