ठाण्यातील कळवा खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
By Admin | Updated: May 3, 2017 17:08 IST2017-05-03T17:08:41+5:302017-05-03T17:08:41+5:30
ठाण्यातील मनीषानगर येथे असलेल्या कळवा खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

ठाण्यातील कळवा खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 03 - ठाण्यातील मनीषानगर येथे असलेल्या कळवा खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कळवा खाडीत चार मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी चार मुलांपैकी तिघे जण पाण्यात पोहण्यासाठी उतरली. यावेळी पोहता-पोहता काहीवेळानंतर तिघेही बुडाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येथील स्थानिकांनी लगेचच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाला पाचारण केले.यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या जवानांना तीन मुलांपैकी एका मुलाला वाचविण्यात यश आले. तर, दोन जणांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला.
दरम्यान, कुलदीप विनोद राहोदीया आणि बजींदर सुरेंद्र सहानी अशी या खाडीत बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर, तिस-या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तसेच, या मुलांना वाचवताना अग्निशमन दलाचे फायरमन रवी पवार यांच्या पायाला काच लागल्याने ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले.