कोल्हापूरमध्ये दोन बसमध्ये टक्कर, ३ ठार

By Admin | Updated: May 7, 2015 09:25 IST2015-05-07T08:37:48+5:302015-05-07T09:25:03+5:30

कोल्हापूरमध्ये खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या दोन बसमध्ये भीषण टक्कर झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

Two bus collides in Kolhapur, 3 dead | कोल्हापूरमध्ये दोन बसमध्ये टक्कर, ३ ठार

कोल्हापूरमध्ये दोन बसमध्ये टक्कर, ३ ठार

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. ७ - कोल्हापूरमध्ये खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या दोन बसमध्ये भीषण टक्कर झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात ३ जण ठार झाले असून २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

कोल्हापूरमधील किणी टोलनाक्याजवळ विरुद्ध दिशेने येणा-या दोन बसेसची टक्कर झाली. बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील एका बसमध्ये व-हाडी असल्याचे समजते.  

Web Title: Two bus collides in Kolhapur, 3 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.