मुळा मुठा नदीत २ शाळकरी मुलींचे मृतदेह सापडले
By Admin | Updated: July 20, 2016 15:37 IST2016-07-20T15:37:48+5:302016-07-20T15:37:48+5:30
वडगावशेरीतील विद्याकुंर शाळेतील मुलांबरोबर फिरायला गेलेल्या ४ मुलींपैकी २ मुलींचे मृतदेह बुधवारी सकाळी नदीच्या पात्रात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुळा मुठा नदीत २ शाळकरी मुलींचे मृतदेह सापडले
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - वडगावशेरीतील विद्याकुंर शाळेतील मुलांबरोबर फिरायला गेलेल्या ४ मुलींपैकी २ मुलींचे मृतदेह बुधवारी सकाळी नदीच्या पात्रात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
स्रेहा सदानंद मोरे आणि छोटीकुमारी सिंग अशी त्यांची नावे असून दोघी १५ वर्षाच्या आहेत़ त्या दहावीत शिकत होत्या़ याबाबत मिळालेली माहिती अशी, या दोघी शाळेतील फुटबॉल क्लासला सकाळी जात असत़ त्या आपल्या आणखी दोन मैत्रिणी व त्यांचे ४ मित्र असे ८ जण १५ दिवसांपूर्वी शाळेत जाण्याऐवजी बाहेर फिरायला गेले होते़ त्यापैकी २ परत आल्या़ दोघी बेपत्ता होत्या़ त्यांच्या अपहरणाचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
वडगाव शेरी येथील साईनाथ परिसरातील मुळा मुठा नदीत बुधवारी सकाळी दोन मुलींचे मृतदेह पाण्यात तरंगताना नागरिकांना दिसले़ त्याची माहिती पोलिसांना दिली़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ नदीच्या काठावर स्पोटर्स शुज, चप्पल, २ बॅगा, जॅकेट, गॉगल ठेवलेले आढळून आले. नदीपात्रातील मृतदेह बाहेर काढल्यावर या मुलीचे हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे़ दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले असून चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या मुली १६ जुलैपासून बेपत्ता होत्या़ त्यातील दोघी परत आल्या़ मुलांबरोबर फिरायला गेल्याचे घरी कळल्यामुळे घाबरुन त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.