दुचाकीची समोरासमोर धडक, दोन ठार
By Admin | Updated: October 28, 2016 20:37 IST2016-10-28T20:37:14+5:302016-10-28T20:37:14+5:30
दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना खामगाव-चिखली मार्गावरील माथणी गावानजीक घडली

दुचाकीची समोरासमोर धडक, दोन ठार
ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 28 - दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास खामगाव-चिखली मार्गावरील माथणी गावानजीक घडली. तालुक्यातील हिवरखेड येथील पंकज पुंडलिक गवई (२५) हा एमएच२८ एआर-१४८५ क्रमांकाच्या दुचाकीने खामगावकडे येत असताना समोरून येणाऱ्या विना नंबरच्या दुचाकीने पंकजच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
दोन्ही मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत पंकज गवईसह दुसऱ्या दुचाकीवरील अजय मेढे गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही जखमींना स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले.
दोघांची प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. दरम्यान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.