मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: June 14, 2016 17:42 IST2016-06-14T17:42:20+5:302016-06-14T17:42:46+5:30
मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आज दोन जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद वरून आलेला दिलीप तुळशीराम मोरे नावाचा व्यक्ती

मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ : मंत्रालयातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आज दोन जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद वरून आलेला दिलीप तुळशीराम मोरे नावाचा व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तपासासाठी त्याला पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी अडवल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील काहीतरी पिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तातडीने जी टी रुग्णालयात नेण्यात आले.
दुसऱ्या एका घटनेत मुख्यमंत्री कार्यालयाच्या जवळ एका व्यक्तीच्या बॅग मध्ये काहीतरी संशयास्पद सापडल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.