चार लाखांचा गंडा घालणार्‍या दोघांना अटक

By Admin | Updated: May 27, 2014 22:58 IST2014-05-27T21:37:42+5:302014-05-27T22:58:21+5:30

परदेशातून मोटारसायकल मागवण्यासाठी एका व्यवसायिकाला चार लाख रूपयांना गंडा घालणार्‍या दोन आरोपींनी गुन्हे शाखने अटक केली.

The two arrested for four lakhs of rupees were arrested | चार लाखांचा गंडा घालणार्‍या दोघांना अटक

चार लाखांचा गंडा घालणार्‍या दोघांना अटक

मुंबई: परदेशातून मोटारसायकल मागवण्यासाठी एका व्यवसायिकाला चार लाख रूपयांना गंडा घालणार्‍या दोन आरोपींनी गुन्हे शाखने अटक केली. यात एक आंतरराष्ट्रीय टोळी सक्रीय सहभागी असल्याचा पोलिसांचा कयास असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दिली.
भारतामध्ये न मिळणार्‍या मोटारसायकल परदेशातून मागवून देण्याचे आमिष दाखवत ही टोळी वेबसाईटच्या आधारे काही ग्राहकांसोबत संपर्क साधत होती. बोरीवलीत राहणारे व्यावसायिक नितीन देसाई यांनाही एक विदेशी बनावटीची महागडी मोटारसायकल खरेदी करायची होती. त्यामुळे त्यांनी या वेबसाईटवर जाऊन त्यावर असलेल्या एका क्रमांकावर फोन केला. फोन केलेल्या इसमाने एका बँकखात्याचा क्रमांक देऊन त्यात चार लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार देसाई यांनी त्या खात्यामध्ये पैसे जमा केले. मात्र पैसे देऊन दोन महिने उलटले तरी मोटारसायकल येत नसल्याने त्यांनी त्या इसमाला अनेकदा फोन केले. मात्र त्या इसमाकडून नेहमीच वेगवेगळी कारणे मिळत होती. काही दिवसानंतर तर आरोपीचा फोन बंद झाल्याने व्यावसायिकाने याबाबत गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या अधिकार्‍यांनी रविवारी बोरिवली येथून दिलशाद मन्सूरी आणि अब्दुल गफार या दोघा आरोपींना अटक केली.
पोलिसांनी या आरोपींची झडती घेेतली असता त्यांच्याकडून काही बनावट पॅनकार्ड, पासपोर्ट, दहा मोबाईल आणि विविध बँकेचे पासबुक आणि एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ही टोळी गेल्या अनेक वर्षापासून अशाप्रकारे लोकांना फसवत असल्याचे स्पष्ट झाले. या टोळीमध्ये काही नायजेरियन नागरिकही सामील असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
.................................................................

Web Title: The two arrested for four lakhs of rupees were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.