शंभरच्या बनावट नोटांसह दोघांना अटक
By Admin | Updated: January 19, 2017 02:23 IST2017-01-19T02:23:01+5:302017-01-19T02:23:01+5:30
१0२ बनावट नोटांसह दोघांना जेरबंद करण्यात आले.

शंभरच्या बनावट नोटांसह दोघांना अटक
कारंजा लाड, दि. १८- शहरात शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या असल्याचे मंगळवारी उघड झाले होते. त्यानंतर कारंजा शहर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित शंभराच्या १0२ बनावट नोटांसह दोघांना जेरबंद केले. या रॅकेटमधील सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.
काजीपुरा येथे महात्मा फुले चौकातील निसार अली रजा अली यांच्या पानटपरीवर प्रट्ठोश पाटील या युवकाने ही शंभर रुपयांची नोट दिली होती. ही नोट पाहून शंका आल्यानंतर निसार अली यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलीसांनी प्रट्ठोश पाटील याला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून शंभर रूपयांच्या ४२ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोपाल रमेश राठोड (२७) याला दारव्हा येथून अटक केली. दोघांवरही भादंवि कलम ४८९ ब, ४८९ क, ४२0 अन्वये गुन्हा दाखल केला.