रत्नागिरीत घंटागाडीची धडक बसून अडीच वर्षांचा मुलगा ठार
By Admin | Updated: September 29, 2016 13:18 IST2016-09-29T13:14:18+5:302016-09-29T13:18:28+5:30
कचरा नेणाऱ्या घंटागाड़ीची धड़क बसून अडीच वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना रत्नागिरीमध्ये घडली.

रत्नागिरीत घंटागाडीची धडक बसून अडीच वर्षांचा मुलगा ठार
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. २९ - शहरातील माळनाका परिसरातील शंखेश्वर मधुबन या इमारतीमध्ये कचरा नेणाऱ्या घंटागाड़ीची धड़क बसून प्रिन्स जोशी हा अडीच वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला. हा प्रकार आज गुरुवारी सकाळी 9.50 वाजता घडला.
या इमारतीचे वॉचमन माधव जोशी आपल्या कुटुंबासह इमारतीच्या आवारात राहतात. रोज सकाळी घंटागाडी आल्यावर ते इमारतीमधील कचरा गाडीमध्ये टाकतात. रोज त्यांच्यामागून त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा प्रिन्स हाही धावत येतो. पण आज प्रिन्सचं दुर्दैव आडवं आलं. बाबांच्या पाठून धावत आलेला प्रिन्स गाडीच्या मागच्या टायरच्या पत्र्यावर आपटला आणि खाली कोसळला. त्याला लगेचच जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याची प्रणज्योत मालवली होती.