आठ दिवसांत दोनदा बदली
By Admin | Updated: December 16, 2015 02:19 IST2015-12-16T02:19:25+5:302015-12-16T02:19:25+5:30
परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांवर योग्य नियंत्रण करता न आल्याने, हत्यार विभागात (एल ए) उचलबांगडी करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर यांची बदली, आता

आठ दिवसांत दोनदा बदली
मुंबई: परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांवर योग्य नियंत्रण करता न आल्याने, हत्यार विभागात (एल ए) उचलबांगडी करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर यांची बदली, आता वाशिम जिल्ह्याच्या अधीक्षकपदी करण्यात आली आहे. त्याशिवाय दोघा अधिकाऱ्यांना अवघ्या आठ दिवसांपूर्वी झालेली बदली रद्द ठरवत, त्यांची अन्यत्र नियुक्ती करण्यात आली आहे. गृहविभागातर्फे नुकतेच हे आदेश जारी करण्यात आले.
मुंबई परिमंडळ-१० अंतर्गत असलेल्या साकीनाका पोलीस ठाण्याच्या दोघा सहायक निरीक्षक व एका कॉन्स्टेबलने एका मॉडेलवर बलात्कार करून, तिच्याकडून ४.३५ लाख व रोख रक्कम उकळल्याची धक्कादायक घटना एप्रिलमध्ये उघडकीस आली होती. संबंधित तरुणीने तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना एसएमएस पाठवून तक्रार केली होती. याची चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकाराबाबत तत्कालीन उपायुक्त होळकर यांची हत्यार विभागात बदली करण्यात आली. आता त्यांना वाशिमला पाठविण्यात आले आहे. त्याशिवाय विनिता साहू यांची वाशिमहून सीआयडी नाशिकला विभागात तर डी. के. झळके यांची भंडारा येथून वाशिमला अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. मात्र, ती रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी साहू यांची भंडाऱ्याच्या पोलीसप्रमुखपदी, तर झळके यांची नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण विद्यालयाच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)