वीस गावांचा संपर्क तुटला
By Admin | Updated: July 30, 2014 00:40 IST2014-07-30T00:40:22+5:302014-07-30T00:40:22+5:30
गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार उपप्रदेशात जोरदार वृष्टी होत आहे.

वीस गावांचा संपर्क तुटला
वसई : गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार उपप्रदेशात जोरदार वृष्टी होत आहे. त्यामुळे उपप्रदेशाचा अनेक भाग पाण्याखाली गेला असून वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. भाताणो-उसगांव दरम्यानच्या पुलावरून सध्या पाणी वाहत आहे. त्यामुळे सुमारे 2क् गावांचा संपर्क तुटला आहे. उसगांव येथे पाण्यात अडकलेल्या 5क् जणांना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले. ग्रामीण भागातही पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.
काल रात्रभर कोसळलेल्या पावसाने वसई-विरार भागातील जनजीवन विस्कळीत झाले. विरार पश्चिमेस गोकुळ टाऊनशीप, नालासोपारा पूर्वेस तुळींज व आचोळे रोड या भागात गुडघ्याइतके पाणी भरल्यामुळे व्यापा:यांनी आपली दुकाने बंद केली. परंतु दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापा:यांच्या मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले.
डहाणू तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाणी साचले. मुख्य रस्त्यांसह पूल व खाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. झाडे उन्मळून पडल्याने घरांची पडझड झाली. तारा तुटल्याने वीज खंडित झाली.
डहाणू तालुक्यात रविवारी सकाळपासून पावसाने जोर धरला होता. सोमवारी सर्वात जास्त 215 मिमी पाऊस झाला. मंगळवारी दुपारी बारा वाजेर्पयत या मोसमात 1,क्51 मिमी पाऊस झाल्याची नोंद तालुका हवामान विभागाने केली आहे. इराणी रोड परिसरातील व्यापारी संकु लात 3-4 फूट पाणी भरल्याने अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व मोबाइल दुकानांचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिक व्यापा:यांनी सांगितले. उपनगरासह समुद्रकिना:यालगत गावांना पाऊस व वा:याचा जास्त फटका बसला. चिंचणी गावात दोन घरांवर झाड पडल्याने भिंतीची पडझड झाली. त्यामध्ये एक किरकोळ जखमी झाला. आगर, नरपड, चिखले, रामपूर इ. गावात ठिकठिकाणी झाडे पडून वीज तारांचे नुकसान झाले. चिखले गावातील मुख्य रस्त्याच्या बाजूचे झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली. घोलवड-बोर्डी परिसरातील सागरी महामार्गावरील खुटखाडी व वहिद्र पुल पाण्याखाली गेल्याने गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. चाकरमान्यांना घरी परतावे लागले. डहाणू-बोर्डी बस सेवा बंद करण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर तुरळक गर्दी होती. बोर्डीत 1क् ते 15 घरात पाणी शिरले. बोरीगाव, जळवाई रस्ता व नागरपाडा मोरी पुरात वाहून गेली. ब्राम्हणपाडय़ातील गोरेपाडा येथील आदिवासींच्या घरात पाणी घुसल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश झांबर यांनी सांगितले.
शेतकरी दुहेरी संकटात : जून व जुलै महिन्यात शेतीकरिता पुरेसा असा पाऊस न झाल्याने प्रथम भात पेरण्या खोळंबल्या, भात रोपे तयार नसल्याने रोपण्याही खोळंबल्याने मध्यंतरी थोडासा पाऊस झाल्यावर रोपण्यांनी जोर धरला परंतु नंतर पावसानेही पाठ फिरविल्याने बरीचशी शेती रोपण्याअभावीच राहिली तर आता जी काही रोपणी झाली होती त्यापैकी ब:याचशा शेतजमिनी आज पाण्याखाली गेल्या काही ठिकाणी भातरोपणी वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे.
4रामपूर गावात रविवारी संध्याकाळी चिंचेचे झाड उन्मळून पडल्याने तीन घरांची पडझड झाली. पीडितांना भरपावसात उघडय़ावर संसार करण्याची वेळ आली. जीवितहानी टळली तरी आर्थिक हानी झाली. तलाठी अनिल वायाळ यांनी पंचनामा केला. सरस्वती माच्छी प्रसूतीकरिता रुग्णालयात दाखल असल्याने अनर्थ टळला.
4तिचे कुटुंबीय दवाखान्यात होते. 25 सिमेंट पत्रे फुटले. सीता माच्छी या महिलेची चार पत्रे फुटली व भिंतीची पडझड झाली. तीही सरवलीला रुग्णालयात होती. तर राधाबाई खोदाराम शुक्रखोद याच्या घराचे सोळा सिमेंट पत्रे फुटली. या सर्वाचे संसार रस्त्यार आला आहे. स्वयंपाक घर, भांडी, कपडे व इतर सामानाचे नुकसान झाले.
वसईत जनजीवन विस्कळीत
पारोळ : सतत दोन दिवस पडणा:या पावसामुळे वसईपूर्व भागातील जनजीवन ठप्प झाले. सोमवारच्या रात्रीच्या मुसळधार पावसामुळे शिरपली ते सायवनर्पयत अंबाडी शिरसाड मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली. त्याचप्रमाणो अंबाडी शिरसाड मार्ग येथे तर पहाटे दुचाकीस्वाराला रस्त्यावरील पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीसह वाहत जात असताना दुचाकीचालक दुचाकीसह पुरात वाहत गेला. त्याचप्रमाणो चांदीप येथे पुरात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी अगिAशमनदलाच्या बोटीला पाचारण करुन त्याला वाचविण्यात आले.
तसेच तपसई, चांदिप, कोपर, खरारतारा, हेदवडे या तानसा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणो या भागातील वीज मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपासून गायब आहे. शेतक:यांचेही या पुरात मोठे नुकसान झाले असून अनेकांची खणलेली रोपे वाहून गेली असून सतत तीन दिवस नवीन भातलागवड केलेली जमीन पाण्याखाली गेल्याने पीक कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
शहरातील मुख्य मार्ग पाण्याखाली
4पूरपरिस्थितीमुळे मेढे, भाताणो पूल पाण्याखाली गेल्यामुळे 5 गावांचा संपर्क तुटला असून आता ग्रामीण भागातील मुख्य मार्ग शिरसाड अंबाडीचा काही भाग पाण्याखाली गेल्यामुळे या संकटाने या भागातील जनजीवन ठप्प केले आहे.