पुण्यात सुतळी बॉम्ब फोडण्यावर बंदी

By Admin | Updated: September 2, 2016 13:48 IST2016-09-02T13:48:09+5:302016-09-02T13:48:09+5:30

फटाक्यांच्या विक्रीसाठी नवीन नियमावली तयार केली असून, त्यानुसार पुण्यात कानठळया बसवणारे सुतळी बॉम्ब फोडण्यावर बंदी घातली आहे.

Twenty Twenty Blast in Pune | पुण्यात सुतळी बॉम्ब फोडण्यावर बंदी

पुण्यात सुतळी बॉम्ब फोडण्यावर बंदी

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २ - पुणे पोलिसांनी फटाक्यांच्या विक्रीसाठी नवीन नियमावली तयार केली असून, त्यानुसार पुण्यात कानठळया बसवणारे सुतळी बॉम्ब फोडण्यावर बंदी घातली आहे. सुतळी बॉम्ब बरोबर अग्निबाण सोडण्यावरही बंदी घातली आहे. 
 
रस्त्यावर किंवा रस्त्यापासून १० मीटर अंतरावर फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. फटाके विक्रीसाठी २५ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर हा कालावधी ठरवण्यात आला आहे. 
 
गणेशोत्सवापासून पुण्यात फटाक्याची मागणी वाढते. दिवाळीत राज्यभरातून फटाक्यांची मागणी वाढते. त्यामुळे ठिकठिकाणी फटाके विक्रीचा स्टॉल लावले जातात

Web Title: Twenty Twenty Blast in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.