‘डायल १०८’ने वाचविले सव्वातीन लाख प्राण
By Admin | Updated: June 8, 2015 01:47 IST2015-06-08T01:47:49+5:302015-06-08T01:47:49+5:30
‘डायल १०८’ या रुग्णवाहिका सेवेमुळे मे अखेर राज्यभरातील तब्बल ३ लाख ३० हजार ३ जणांना जीवदान मिळाले आहे.

‘डायल १०८’ने वाचविले सव्वातीन लाख प्राण
पुणे : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि बीव्हीजी इंडिया कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या ‘डायल १०८’ या रुग्णवाहिका सेवेमुळे मे अखेर राज्यभरातील तब्बल ३ लाख ३० हजार ३ जणांना जीवदान मिळाले आहे.
१०८ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर तात्काळ महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात़ २६ जानेवारी २०१४ रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा ९३७ रुग्णवाहिका आहेत़ यामध्ये २३३ अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका असून ७०४ बेसिक रुग्णवाहिका समाविष्ट आहेत़ अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते, अशी माहिती महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस चे मुख्य संचालन अधिकारी डॉ़ ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली़
सेवा देण्यात आलेले जिल्हानिहाय रुग्ण
नगर १४९५०, अकोला ५९०४, अमरावती ११०२७
औरंगाबाद १४०९१, बीड ९४७२, भंडारा ४३५७
बुलढाणा ८४३४, चंद्रपूर ६८३९,
धुळे ६४५७,
गडचिरोली २५५१, गोंदिया ४८४३, हिंगोली ५३०८,
जळगाव १२१११, जालना ६२५७, कोल्हापूर १५०१३,
लातूर १०४७३, मुंबई २६५३९, नागपूर १२२९४
नांदेड १२९५५, नंदुरबार ४७०७, नाशिक १६२२५
उस्मानाबाद ६५७४, परभणी ५७०१, पुणे २२६३४
रायगड ४९७१, रत्नागिरी ३८६२, सांगली १०७८७
सातारा ११२७३, सिंधुदुर्ग २८८३, सोलापूर १४१२३
ठाणे १५३९३, वर्धा २७५०,
वाशिम ४४०७
यवतमाळ १०४२७, पालघर २९९६़