महिला डब्यात २५ हजार पुरुषांची घुसखोरी
By Admin | Updated: July 4, 2016 02:23 IST2016-07-04T02:23:50+5:302016-07-04T02:23:50+5:30
लोकलमधील महिला डब्यात पुरुष प्रवाशांकडून प्रवेश केला जात असून, अशांविरोधात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे.

महिला डब्यात २५ हजार पुरुषांची घुसखोरी
मुंबई : लोकलमधील महिला डब्यात पुरुष प्रवाशांकडून प्रवेश केला जात असून, अशांविरोधात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे.
२0१४पासून ते आतापर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल २५ हजारांपेक्षा जास्त पुरुष प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ८0 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला.
आरक्षित महिला डब्यात पुरुषांनी घुसखोरी केल्यास त्या प्रवाशाला पकडून न्यायालयात हजर केले जाते आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. ही कारवाई जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यंत होते. महिला डब्यातील पुरुष प्रवाशांची ही घुसखोरी थांबावी यासाठी १५ जुलैपर्यंत विशेष मोहीम पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)
>२ जुलै रोजी विशेष मोहिमेद्वारे महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. यात १३६ जणांना पकडण्यात आले. अंधेरी, दादर, वांद्रे, बोरीवली, भार्इंदर, बोईसरमध्ये सर्वाधिक कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.