तहसीलदारांची वीस दिवसांची धडक मोहीम
By Admin | Updated: April 13, 2015 11:38 IST2015-04-13T05:22:51+5:302015-04-13T11:38:04+5:30
तालुक्यात सुरू असलेल्या, बेकायदेशीर खदाणी, नदी नाल्या वरील बेसुमार वाळू उपसा, बांधकाम व्यावसाईकांनी चालविलेली रॉयल्टीचोरी,

तहसीलदारांची वीस दिवसांची धडक मोहीम
टोकावडे : तालुक्यात सुरू असलेल्या, बेकायदेशीर खदाणी, नदी नाल्या वरील बेसुमार वाळू उपसा, बांधकाम व्यावसाईकांनी चालविलेली रॉयल्टीचोरी, शासनाला नाममात्र फी भरून वारेवाफ, गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी महसूल विभाग हतबल झाले असतानाच, गेल्या २० दिवसंपूर्वी रुजू झालेले आयएएस दर्जाचे तहसीलदार कौस्तुभ दिवेगावकर यांनी धडक मोहीम राबवून, कोट्यवधीचा महसूल शासकीय तिजोरीत जमा केला. त्यांच्या या धडक मोहिमेमुळे रॉयल्टी बुडविणा-यांचे धाबे दणाणले आहे.
माळशेज घाट परिसरात अनेक बेकायदेशीर खदाणी घाटघर येथील खदाण व डांबर प्लांटला ७५ लाखांचा दंड, यांत्रिक साहित्य जप्त करून ७ जणांवर गुन्हा दाखल. रामदेवबाबा डेव्हलपर्सवर कोट्यवधीची दंडात्मक कारवाई वाळू माफियांवर धाडसत्र, जुन्नर, नगर, आळे फाटा येथून बाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर, ट्रकवर दंडात्मक कारवाई केली. ही गेल्या २० दिवसात करून, शासनाची तिजोरी भरून काढण्याची तालुक्यातील ५० वर्षांतील पहिली घटना म्हणावी लागेल. (वार्ताहर)