गुहागर समुद्रात 12 वर्षांचा मुलगा बुडाला

By Admin | Updated: May 14, 2017 10:34 IST2017-05-14T10:27:29+5:302017-05-14T10:34:13+5:30

गुहागर समुद्र किनाऱ्यावर एक बारा वर्षांचा मुलगा बुडाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना

Twelve years old son died in Guhagar sea | गुहागर समुद्रात 12 वर्षांचा मुलगा बुडाला

गुहागर समुद्रात 12 वर्षांचा मुलगा बुडाला

ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. 14 - गुहागर समुद्र किनाऱ्यावर एक बारा वर्षांचा मुलगा बुडाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.  पुष्कराज राजाराम पाटील असं त्या मुलाचं नाव असून तो सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे येथील रहिवासी आहे. पुष्कराज आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी येथे आला होता. शोधकार्य सुरू असून अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही.

पुष्कराज त्याच्या दोन बहिणी त्याचे आई-वडील आणि दुसरे एक कुटुंब असे सातजण फिरायला आले होते. त्यापैकी पुष्कराज आपल्या वडील आणि बहिणींसह पोहोण्यासाठी समुद्रात उतरला होता. अचानक तो बुडू लागला त्याच्या वडिलांनी त्याचा हात धरून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पुष्कराजचा हात त्यांच्या हातातून निसटला आणि तो बुडाला. 

                 

Web Title: Twelve years old son died in Guhagar sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.