शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बारा हजार पालक ‘दत्तक’ मुलांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 19, 2015 22:56 IST

प्रक्रिया आॅनलाईन : समाजाचा वाढता प्रतिसाद; देशभरातील संस्थांमध्ये सुमारे सहा हजार बालके

विश्वास पाटील - कोल्हापूर -मुले दत्तक देण्याच्या प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखून ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारने ही प्रक्रिया आता आॅनलाईन केली आहे. सद्य:स्थितीत दत्तक देता येण्याजोगी देशभरातील संस्थांमध्ये सुमारे सहा हजार बालके असताना मूल दत्तक हव्या असलेल्या बारा हजारांहून जास्त पालकांची प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे ‘कुणी बाळ देता, का बाळ’ अशीच काहीशी पालकांची अवस्था बनली आहे. आतापर्यंत ही सर्व प्रक्रिया कागदोपत्री होती. त्यामुळे मुले दत्तक देण्यास विलंब होत होताच शिवाय त्यावर नियंत्रण ठेवणेही अवघड होते. आता दत्तक देण्यासाठी किती मुले उपलब्ध आहेत, त्यांची छायाचित्रे व त्यांच्याबद्दलची सगळी इत्थंभूत माहिती पालकांना आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. जे पालक बाळ दत्तक घेऊ इच्छितात त्यांचीही माहिती यामुळे सर्व संस्थांना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटी (कारा) ही संस्था ही प्रक्रिया नियंत्रित करते. या प्रक्रियेमुळे देशभरातील सर्व दत्तक देण्यात येणाऱ्या मुलांची आमि इच्छुक पालकांचीही माहिती ‘कारा’कडे उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्रात देशाबाहेर मुले दत्तक देण्याची परवानगी असलेल्या (रिपा संस्था) २१ आणि देशातच दत्तक देणाऱ्या ४५ संस्था आहेत. आताच्या पद्धतीनुसार दत्तक देण्यासाठीचे मूल त्या संस्थेत कधी आले व ते कधी दत्तक दिले गेले, हा ट्रॅक तपासणे शक्य होत नव्हते. आता मूल बाल न्याय समितीकडून अ‍ॅडॉप्शनसाठी मुक्त होताच दोन महिन्यांच्या आत ते दत्तक देणे बंधनकारक असेल. आतापर्यंत दोन पालकांचा नकार आल्यावर त्या मुलास परदेशात दत्तक दिले जात होते. अशा व्यवहारात काही संस्थांकडून पैशांची लूटमार होत असे. हे शासनाच्या लक्षात आल्याने ८० टक्के मुले ही भारतातच दत्तक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांना मूल दत्तक घ्यायचे आहे, त्यांच्याकडे पॅनकार्ड आणि स्वत:चा मेल आयडीही हवा. पालकांनी मूल पसंत केल्यानंतर महिन्याच्या आत गृहभेट करणे बंधनकारक केले आहे. केंद्र सरकारने हे काम सोपे व्हावे यासाठी प्रत्येक राज्यांसाठी स्वतंत्र समन्वयक अधिकारी नियुक्त केला आहे. पूर्वी या कोणत्याच प्रक्रियेचा कालावधी निश्चित नव्हता. त्यामुळे सगळी प्रक्रियाच वेळखाऊ होती. नव्या पद्धतीमुळे त्यात सुलभता आली असून दत्तक चळवळीला त्यामुळे अधिक गती येऊ शकेल, असे या क्षेत्रांतील जाणकारांचे म्हणणे आहे.मुला-मुलींना दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला चळवळीचे स्वरूप आले असून ती प्रवाही होत आहे. समाजातील चांगल्या बदलाचे हे लक्षण आहे. त्या संदर्भातील कायद्यातील बदल हेही या मुला-मुलींचे भवितव्य योग्यरितीने घडावे यादृष्टीने करण्यात आले आहेत.- डॉ. प्रमिला जरगपदसिद्ध अध्यक्ष,अनाथालये व इतर धर्मादायगृहे अधिनियमांतर्गत स्थापन नियंत्रण मंडळम्राज्यात हजारावर दत्तकविधानमहाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे १५०० मुले उपलब्ध असतात. त्यातील ११०० ते १२०० मुले दत्तक दिली जातात. मुलांची मागणी अडीच हजाराच्या आसपास असते. या नोंदी ठेवणारा स्वतंत्र कक्ष पुण्यात आहे.