मोहरममध्ये नऊ जणांना बाराशे रुपयांचा दंड
By Admin | Updated: January 14, 2015 04:57 IST2015-01-14T04:57:22+5:302015-01-14T04:57:22+5:30
नुकत्याच झालेल्या मोहरममध्ये स्वत:ला मारून घेणा-या ९ जणांना १,२०० रुपयांचा दंड ठोठावला असून

मोहरममध्ये नऊ जणांना बाराशे रुपयांचा दंड
मुंबई : नुकत्याच झालेल्या मोहरममध्ये स्वत:ला मारून घेणा-या ९ जणांना १,२०० रुपयांचा दंड ठोठावला असून, त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने मंगळवारी उच्च न्यायालयात सादर केले़ न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठासमोर हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले़
मोहरममधील अल्पवयीन मुलांच्या सहभागाला निर्बंध घालावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करताना शासनाने हे प्रतिज्ञापत्र सादर केले़ त्याचवेळी या याचिकेला विरोध करणाऱ्या डझनभर याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत़ मोहरमची परंपरा १,४०० वर्षांची आहे़ याला विरोध करणे योग्य नाही़ तेव्हा ही याचिकाच फेटाळून लावावी, अशी मागणी या याचिकांमध्ये केली आहे़ मात्र मोहरममध्ये शिया पंथीय मुस्लीम स्वत:ला शस्त्राने मारून घेतात़ तेव्हा यास मनाई करावी व लहान मुलांच्या सहभागावर निर्बंध आणून, तशी हमीच असे करणाऱ्यांकडून घ्यावी, अशी मागणी याचिकेत केली़ यावरील सुनावणी दोन आठवड्यांनी होईल.