अमलीपदार्थ विकणारे बारा जण अटकेत
By Admin | Updated: July 14, 2014 03:50 IST2014-07-14T03:50:27+5:302014-07-14T03:50:27+5:30
हैदराबाद येथे अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत १२ आरोपींपैकी मुख्य आरोपीसह तब्बल ९ जण वसईतील आहेत
अमलीपदार्थ विकणारे बारा जण अटकेत
नायगाव : हैदराबाद येथे अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत १२ आरोपींपैकी मुख्य आरोपीसह तब्बल ९ जण वसईतील आहेत. सदर आरोपींना हैदराबाद पोलीस व नार्कोटिक्स यांच्या संयुक्तरीत्या कारवाईत रंगेहाथ अटक केली. एकूण १२ आरोपींना एफि ड्राईन व अॅमफेटाईन या अमलीपदार्थांच्या तब्बल २५० किलो साठ्याबरोबर अटक केली. दोन कार, दोन लाख रु. रोख असा १० करोड रू.चा मुद्देमाल जप्त केला.
फैयाज रसुल शेख (४०, रा. वसई कोळीवाडा), पी श्रीनिवास (रा. हैदराबाद), करीकल्लन (रा. चेन्नई), सुनील सरदार (रा. गुजरात) यांसह समीर पिंजार, मोहम्मद इस्माइक, हशीम शेख, मोहम्मद अन्साज, सैयाद पाश, आदिल अन्सारी, पी. किश्तैया, दयानंद मुडन्नार हे सर्व वसईतील रहिवासी आहेत. यापैकी फैयाज हा मुख्य आरोपी असून, याआधीही तो गुजरात येथे पकडला गेला होता. त्या वेळी त्याला काही काळ कोठडी मिळाली होती, अशी माहिती वसई पोलिसांना दिली.
आरोपी करीकल्लन याने फैयाज याच्याकडे एफिड्राईन व अॅमफेटेमाईनची मे महिन्यात आॅर्डर दिली होती. या आॅर्डरच्या डिलिव्हरीसाठी फैयाज व श्रीनिवास करीकल्लन याला हैदराबाद येथे भेटण्यासाठी गेले होते. याचवेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपींची मोडस् अॅपरेन्डी अजूनही कायम आहे. बंद झालेले कारखाने विकत घेऊन त्यामध्ये हे दोन्ही पदार्थाचे मिश्रण बनवण्याचे काम करीत. त्यासाठी माणसे ठेवली जात. यापूर्वी गुजरात सिल्वासा येथेही अशाच बंद फॅक्टरीमधून अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले होते. (वार्ताहर)