मालवणी येथे टीव्हीच्या वेडापायी मुलीची आत्महत्या

By Admin | Updated: August 30, 2016 06:17 IST2016-08-30T06:17:38+5:302016-08-30T06:17:38+5:30

पालकांनी टीव्ही पाहण्यास विरोध केल्याने सोळा वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार मालवणीत रविवारी रात्री घडला असून, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद मालवणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

TV felony girl suicide in Malwani | मालवणी येथे टीव्हीच्या वेडापायी मुलीची आत्महत्या

मालवणी येथे टीव्हीच्या वेडापायी मुलीची आत्महत्या

मुंबई : पालकांनी टीव्ही पाहण्यास विरोध केल्याने सोळा वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार मालवणीत रविवारी रात्री घडला असून, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद मालवणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मालवणी परिसरात सिमरन
इलियाझ सय्यद (१६) ही कुटुंबीयांसोबत राहायची. मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरन हिला टीव्हीवरील मालिका पाहण्याची आवड होती.
सतत टीव्ही पाहत पालकांना ती काही ना काही विचारत राहायची. रविवारी रात्रीदेखील असेच काहीतरी तिने त्यांना विचारले. त्यामुळे सतत टीव्ही बघू
नये सांगत घरच्यांनी तिला दम
भरला.
त्या रागाने तिने रविवारी रात्री घरात ओढणीने गळफास घेतला. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणतीही चिठी सापडलेली नाही. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले.

Web Title: TV felony girl suicide in Malwani