शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

प्रश्न विचारणारेच देशप्रेमी, उत्तरे न देणारे देशद्रोही! - तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 16:48 IST

मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले.

ठळक मुद्दे तीसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलननाशिक - मुंबई अशी पायपीट करत सत्ताधा-यांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही.

नाशिक : देशाला आज पुन्हा क्रांतीची गरज वाटत आहे. राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टहिताच्यादृष्टीने चिंतेची बाब आहे. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना देशाची काळजी असते, त्यामुळे ते देशप्रेमीच आहे; मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे न देणारे लोक देशद्रोही वाटतात, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.विचार जागर मंच व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तीसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गांधी संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व साहित्यीक उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, श्रीपाद जोशी, डॉ. गोपाळ गुरू उपस्थित होते. यावेळी गांधी यांनी मूलतत्ववादी विचारधारेवर जोरदारी टीका करत आंबेडकर-महात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरविणा-यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्येही वैचारिक मतभेद असतील मात्र त्यांनी कधीही एकमेकांचा द्वेष केला नाही. गांधीजींच्या खूनाच्या खटल्याप्रसंगी आंबेकर कायदेमंत्रीपदावर असतानाही ते सुनावणीच्या वेळी जातीने उपस्थित राहत होते. त्यामुळे आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही. या दोघांना मानणा-या वर्गापैकी काही भक्तांनी आपली तर्कबुध्दी गहाण ठेवून गांधी-आंबेडकरांमध्ये शत्रुत्व निर्माण करुन त्यांच्यावर अन्याय केला. पुणे करारावर बाबासाहेबांनी गांधीजींच्या हट्पोटी स्वाक्षरी केली असे म्हणणे चुकीचे आहे. कारण त्यांनी स्वाक्षरीराष्ट्रप्रेम व देशभक्तीमधून केली होती. त्यावेळी इंग्रज राजकिय विभागणी करण्याचा डाव आखत होते, याची जाणीव बाबासाहेबांना होती, असे तुषार गांधी यांनी यावेळी सांगितले.

‘चंपारण्य-खेडा’नंतरही शेतक-यांच्या समस्या ज्वलंतचंपारण्य  व खेडा सत्याग्रह १९१८साली बापूंनी केला मात्र त्यानंतरही शेतक-यांचे प्रश्न आजही तितकेच ज्वलंत वाटत आहे. न्याय मागण्यांसाठी शेतकरी नाशिक - मुंबई अशी पायपीट करत सत्ताधा-यांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आहे शेतक-यांच्या व्यथा सांगण्यासाठी. आजही या सरकारच्या काळात मजूर, कष्टकरी कामगार, शेतकरी, दलीत असे सर्वच घटक असुरक्षित झाले आहे. मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकMahatma Gandhiमहात्मा गांधीDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती