मुंबईतील रेल्वे प्रकल्प अडचणीत
By Admin | Updated: April 19, 2017 03:18 IST2017-04-19T03:18:21+5:302017-04-19T03:18:21+5:30
मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये अडथळे येत असल्याने या प्रकल्पांची कालमर्यादा आणखी पुढे सरकत असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील रेल्वे प्रकल्प अडचणीत
मुंबई : मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये अडथळे येत असल्याने या प्रकल्पांची कालमर्यादा आणखी पुढे सरकत असल्याचे समोर आले आहे.
रेल्वेच्या जागांवर अतिक्रमण, ते हटवण्यास असलेला विरोध आणि जागेची कमतरता यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यास अनंत अडचणी येत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अंधेरी ते गोरेगाव या हार्बर मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे. मात्र हा प्रकल्प बराच रखडला आहे. आता या प्रकल्पासाठी २0१७च्या डिसेंबरपर्यंतची मर्यादा वाढवून दिली आहे.
दुसरीकडे एमयूटीपी-२ अंतर्गत बोरीवली-मुंबई सेंट्रल सहाव्या मार्गिकेचा प्रकल्पही बरीच वर्षे रखडला आहे. असून, हा प्रकल्प बरीच वर्षे रखडला आहे. या प्रकल्पासाठी कालमर्यादा वेळोवेळी बदलण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
ठाणे ते दिवा पाचवी-सहावी मार्गिका
हा मार्ग पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागतील, अशी माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली. प्रकल्पात काही बांधकामांचा अडथळा असून, ते पाडावे लागतील. त्यासाठी थोडा उशीर होत असून, प्रकल्पाचे काम मार्च २0१९पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी स्पष्ट केले.
बेलापूर-सीवूड-उरण मार्च २0१८ नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वांत महत्त्वाच्या बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे काम मार्च २0१८पर्यंत पूर्ण करण्यात येईल. याआधी काम डिसेंबर २0१७ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात येत होते. परंतु, या प्रकल्पाच्या कामात काही वनविभागाची जमीन येत असल्याने कामाला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.