शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

अबब! प्लास्टिक...केस...धातुचे पदार्थ खाण्याच्या सवयीने तिच्या पोटात १५ इंचचा टयूमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 16:34 IST

लहानपणी तिशाला प्लास्टिक, भिंतींना लावलेल्या रंगाचे निघालेले पोपडे, धातूचे पदार्थ, केस इत्यादी खाण्याची सवय होती.

ठळक मुद्दे डॉ. महेंद्र कवेडियांनी दिले जीवनदान

पुणे : तिशा डिसुझा... वय वर्ष १६... सोलापुरात लहानाची मोठी झालेल्या तिशाला अचानक पोटात दुखायला लागले, ताप यायला लागला, उलटया व्हायला लागल्या... आपल्या लाडक्या मुलीच्या या दुखण्याने तिचे आई-बाबा हवालदिल झाले. सोलापुरातल्या अनेक डॉक्टरांना दाखवून झाले. परंतु तेवढयापुरता आराम पडायचा नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या व्हायचे. तिशा पुन्हा तापाने फणफणायची, पोटातील वेदनांमुळे गडबडा लोळायची, उलट्या करायची. तिशाच्या या अगम्य आजाराने हादरलेले तिचे वडील डेनिस डिसुझांनी अखेरीस तिला पुण्याला नेण्याचे ठरवले.  फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र कवेडिया तिच्यासाठी देवदूतच ठरले!    जहांगीर रूग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. कवेडियांनी तिशाची प्राथमिक तपासणी केली. त्यात त्यांना तिच्या पोटात काहीतरी जड वस्तू असल्याचे जाणवले. त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली. परंतु तिशाचा सोनोग्राफी अहवाल सामान्य आला. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे मग डॉ. कवेडियांनी तिशाचे सीटी स्कॅन करायला सांगितले.  तिशाच्या पोटात एक मोठा गोळा तयार झाला असून त्याचा आकार चेंडूसारखा असल्याचे सीटी स्कॅनमध्ये निष्पन्न झाले. या गोळ्याच्या हालचालीमुळे तिशाला पोटात तीव्र वेदना होण्याबरोबरच इतरही त्रास होत होते. लहानपणी तिशाला प्लास्टिक, भिंतींना लावलेल्या रंगाचे निघालेले पोपडे, धातूचे पदार्थ, केस इत्यादी खाण्याची सवय होती. वयाच्या पाचव्या वषार्पासून तिला ही सवय लागली ही गोष्ट समोर आली. लेप्रोस्कोपिक सर्जन असलेल्या डॉ. गोरी सिंह यांनी तिशावर शस्त्रक्रिया केली. तिशाच्या पोटात केसांचा आणि इतरही साहित्याचा गुंता तयार होऊन त्याने मोठा आकार धारण केला होता. तिच्या पोटात आकाराला आलेला हा ट्युमर १५ इंच लांब आणि ६०० ग्रॅम वजनाचा होता. त्याच्या हालचालीमुळेच तिशाला उलट्या होणे, ताप येणे, वजन घटणे इत्यादी त्रास होत होता. तिच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तिशा आता रुग्णालयातून घरी जाण्यास सज्ज झाली आहे. सोलापूरच्या बिशप शाळेत वॉचमनची नोकरी करणा-या डेनिस डिसुझांच्या तिशाला डॉक्टरांच्या टीमने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. --------------------------------------------------- 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर