तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला
By Admin | Updated: July 20, 2016 05:59 IST2016-07-20T05:59:31+5:302016-07-20T05:59:31+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी तुळशी तलाव आज सकाळी ६ वाजता भरून वाहू लागला.

तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी तुळशी तलाव आज सकाळी ६ वाजता भरून वाहू लागला.गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन महिने आधीच हा तलाव भरला आहे़ मात्र, आणखी काही तलाव भरेपर्यंत पाणीकपात कायम राहणार आहे़ त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही काळ पाणीकपातीची झळ सहन करावी लागणार आहे़
गेल्या वर्षी मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता़ त्यामुळे आॅगस्ट २०१५ पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली़ या वर्षी पाऊस जोरदार असल्याने तलावांमधील जलपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याची मागणी जोर धरीत आहे़ त्यात आज सकाळी तुळशी तलाव भरून वाहू लागला़ गेल्या वर्षी हा तलाव २२ सप्टेंबर रोजी भरला होता़
तसेच तलावांमध्ये सात लाख
५२ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे पाणीकपात मागे घेण्याची मागणी पुन्हा एकदा होऊ लागली आहे, परंतु तुळशी तलावातून मुंबईची केवळ एक टक्काच तहान भागेल़ उर्वरित ९९
टक्के पाण्याची तजवीज करणारे तलाव भरेपर्यंत पाणीकपात मागे घेण्याचा प्रस्ताव नसल्याचे, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)
>मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये
१ आॅक्टोबर
रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़
मुंबईला दररोज ३,७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़
गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात सुरू असल्याने ३,२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़