तुकोबारायांना भाजी-भाकरीचा नैवेद्य
By Admin | Updated: June 27, 2014 00:14 IST2014-06-27T00:14:44+5:302014-06-27T00:14:44+5:30
राष्ट्रीय सेवा योजनेच्या 1क्क् विद्याथ्र्यानी खेळलेल्या शिस्तबद्ध फुगडय़ा.. असे विहंगम दृश्य रणरणत्या उन्हात रोटी घाटात अनुभवायला मिळाले.

तुकोबारायांना भाजी-भाकरीचा नैवेद्य
>अभिजित कोळपे
- उंडवडी गवळ्याची
डोक्यावरील ऊन.. शिस्तबद्ध दिंडय़ांचे मार्गक्रमण.. ज्येष्ठ महिला व युवतींनी धरलेला फेर.. अन् राष्ट्रीय सेवा योजनेच्या 1क्क् विद्याथ्र्यानी खेळलेल्या शिस्तबद्ध फुगडय़ा.. असे विहंगम दृश्य रणरणत्या उन्हात रोटी घाटात अनुभवायला मिळाले.
दुपारी साडेबाराच्या दरम्यान तुकोबारायांच्या पालखीने रोटी घाट चढायला सुरुवात केली. पालखी घाटाच्या मध्यभागावर आली. तेव्हा परंपरेप्रमाणो रोटी ग्रामस्थांनी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवून बैलजोडीचे पूजन केले. सकाळी साडेसहाच्या दरम्यान ‘ज्ञानोबा माऊली.. तुकाराम’च्या गजरात पालखीने पहिल्या विश्रंतीसाठी भागवतवस्तीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. त्यानंतर दुपारच्या विश्रंतीसाठी पाटसला 12च्या दरम्यान दाखल झाली. रोटी घाट, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, खराडवाडी असे मार्गक्रमण करीत संध्याकाळी 7 वाजता पालखी उंडवडी गवळ्याची येथे मुक्कामासाठी आली.
उद्याचा मुक्काम शारदा विद्यालयात
उद्या (शुक्रवारी) सकाळी 7च्या दरम्यान पालखी उंडवडी गवळ्याची येथून मार्गस्थ होईल, उंडवडी पठार, दुपारचा मुक्काम ब:हाणपूर, मोरेवाडी, सराफ पेट्रोलपंप येथे विसावा घेऊन मुक्कामास बारामतीच्या शारदा विद्यालय प्रांगणात दाखल होणार आहे.
महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी ‘सायबर लॉ’ आणण्याचा प्रयत्न
वाल्हे : संत व ईश्वर निंदा कायद्याबद्दल वारकरी मागणी करीत आहेत. केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीतील हा विषय असून केंद्र व राज्याने समन्वयाने हा कायदा करावा लागेल. तरीही सोशल मीडियावरील महापुरुषांची बदनामी रोखण्यास ‘सायबर लॉ’ आणण्याचा आमचे सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी दिली. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात शुक्रवारी जेजुरी ते वाल्हे या वाटचालीत तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आ. भीमराव तापकीर, बाळा भेगडे यांनी सहभाग घेतला. दरवर्षी पाऊस व खळखळणारे ओढे, त्यात वारकरी मनसोक्त आंघोळ करताना दिसतात. यंदा मात्र पिण्याच्या पाण्याची भ्रांत होती. काळवंडलेला डोंगर, धूळ, ऊन, वारा अशा रुक्ष वाळवंटातूनही भक्तीची बीजे पेरत माऊलींची वाटचाल सुरू होती.
आज माऊली साता:यात
शुक्रवारी सकाळी पुणो जिल्ह्यातला वाल्हे येथील शेवटचा मुक्काम करून पालखी दुपारी नीरा येथून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येणार आहे.