तुकोबांचा सोहळा लोणी काळभोरमध्ये
By Admin | Updated: June 23, 2014 22:27 IST2014-06-23T22:27:16+5:302014-06-23T22:27:16+5:30
टाळ मृदंगाच्या गजरात संतशिरोमणी श्री तुकाराममहाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोरमध्ये आला.

तुकोबांचा सोहळा लोणी काळभोरमध्ये
>लोणी काळभोर :
अंतरीची घेतो गोडी।
पाहे जोडी भावांची॥
देव सोयरा, देव सोयरा।
देव सोयरा दिनाचा॥
आपुल्या वैभवे।
शंृगारावे निर्मळ॥
तुका म्हणो जेवी सेवें।
प्रेम द्यावे प्रीतीचे॥
अशा भक्तिभावाने ओथंबलेल्या अभंगाच्या ओळी गात सावळ्या विठुरायाच्या भेटीस आतुरलेली लाखो वैष्णवांची मांदियाळी पुण्यनगरीचा दोन दिवसांचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात संतशिरोमणी श्री तुकाराममहाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोरमध्ये आला. त्या वेळी सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांसमवेत विविध संस्था, संघटना व मंडळांचे कार्यकर्ते व पंचक्रोशीतील नागरिकांनी फुलांच्या वर्षावात, ढोल-ताशाच्या गजरात केले.
पुणो येथील निवडुंग्या विठोबा मंदिरातून आज सकाळी पालखी सोहळा पुलगेटमार्गे हडपसर येथे आला. गाडीतळ येथे दुपारचा विसावा घेऊन सोहळ्याने पुणो-सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोरकडे मार्गक्रमण केले. शेवाळवाडी ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करून सोहळा मांजरी फार्म येथे विसावला.या ठिकाणी जिल्हा परिषद पुणो व पंचायत समिती हवेली यांच्या वतीने सर्व दिंडी प्रमुखांचे उपरणो व श्रीफळ देऊन स्वागत केले. या वेळी पंचायत समिती हवेलीचे सभापती अशोक खांदवे, उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, विस्तार अधिकारी एस. डी. सोनवणो, एस. डी. जाधव, सरपंच सुमन घुले, उपसरपंच शिवराज घुले उपस्थित होते.
कवडीपाट टोलनाका येथे आर्यन टोल रोड कंपनीचे व्यवस्थापक गंगाधर पाईकराव, कवडीपाट टोलनाक्याचे व्यवस्थापक सुरेश धावरे व कर्मचारी यांच्या वतीने केलेल्या स्वागताचा स्वीकार करून पालखी सोहळ्याने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश केला. त्या वेळी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, पंचायत समिती सदस्या गौरी गायकवाड, सरपंच नंदू काळभोर, उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांच्या समवेत सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोठय़ा भक्तिभावाने स्वागत केले. संभाजीनगर येथे एंजल हायस्कूलच्या विद्याथ्र्यानी त्याचे स्वागत केले, तर लोणी स्टेशन येथे दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्याने लोणी काळभोरमध्ये प्रवेश केला, त्या वेळी सर्व वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर नाचत होते. काही जण फुगडय़ा खेळत होते, तर काहींनी मानवी मनोरे उभारून आपला आनंद व्यक्त केला. त्याच उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत केले. दत्त मंदिरानजीक गावकामगार तलाठी जे. जी. शेवाळे, अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केशव आबा काळभोर, सरपंच चंदर शेलार, उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, प्रशांत काळभोर व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले. तसेच, भाजी मंडईजवळ जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले, पंचायत समिती सदस्या र}ाबाई भोसले यांनी शिवसेनेच्या वतीने स्वागत केले.
पालखी गावातील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोहोचल्यानंतर आरती झाली. सर्व वारक:यांना योगिनी एकादशीचा उपवास असल्याने गावातील अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठान, संत निरंकारी मंडळ, शीतला शक्ती मंडळ, तिरंगा मित्र मंडळ, शिवशक्ती मंडळ, जय बजरंग तरुण मंडळ, संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट, जय महाराष्ट्र तरुण संघटना, जय जवान ग्रामविकास प्रतिष्ठान, राजा शिवछत्रपती तरुण मंडळ, महात्मा फुले मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, समता समाजसेवा तरणि मंडळ, क्रांतिवीर मित्र मंडळ, श्रीमंत अंबरनाथ मंडळ, महात्मा गांधी मित्र मंडळ व इतर सेवाभावी संस्थांनी उपवासाच्या पदार्थाचे वाटप केले. भजन, कीर्तन, प्रवचन व हरिनामाच्या जागरामुळे परिसर विठ्ठलमय होऊन गेला होता.
पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे ढोललेझीम पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते, तर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी वृक्षदिंडीद्वारे पर्यावरण वाचवा असा संदेश देऊन जनजागृती केली. याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कन्यार} व पर्यावरण वाचवा संदेश दिला.